Thursday, 15 December 2011

हार्ड डिस्कचा तुटवडा



कम्प्युटर्स, लॅपटॉपमध्ये हार्ड डिस्क नसणे म्हणजे चारचाकी गाडीला अॅक्सलेटर नसणे. कुठल्याही प्रकारचा डेटा स्टोअर करण्यासाठी हार्ड ड्राइव्ह असणे गरजेचे असते. पण हार्ड डिस्कचाच तुटवडा जाणवू लागला तर? यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात थायलंडमध्ये आलेल्या पूराचा मोठा फटका कम्प्युटर वर्ल्डला बसला असून हार्ड ड्राइव्हच्या तुटवड्यामुळे येत्या काळात कम्प्युटर्सच्या प्रॉडक्शनवर विपरित परिणाम होणार आहे. हार्ड ड्राइव्ह बनविणाऱ्या जगातील पहिल्या क्रमांकाच्या इंटेल कार्पाेरेशनने आगामी काळात हार्ड ड्राइव्हचा पुरवठा कमी होईल असे जाहीरच केले आहे.

जुलै महिन्याच्या शेवटी थायलंडमध्ये आलेल्या पूरात शेकडो माणसांचा मृत्यू आणि करोडोंचे नूकसान झाले होते. पण त्याचा सर्वाधिक फटका कम्प्युटर वर्ल्डला बसणार आहे. या प्रचंड पुरामुळे केवळ इंटेलच नव्हे तर सीगेटसारख्या अनेक हार्ड डिस्क तयार करणाऱ्या कंपन्यांचे मोठे नुकसाने झाले आहे. दरम्यान, इंटेल कॉर्पाेरेशनच्या अधिकाऱ्यांनीच हार्ड ड्राइव्हच्या पुरवठ्यावर येत्या तिमाहीत घट होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इंटेलच्या या इशाऱ्यामुळे एचपी, डेल, लेनोवो, एसर अशा कम्प्युटर्स आणि लॅपटॉप बनविणाऱ्या कं पन्यांनीही तत्काळ पावले उचलत हार्ड ड्राइव्हचा उपलब्ध स्टॉक जपून वापरत कम्प्युटर्सच्या निमिर्तीच्या वेगावर नियंत्रण आणले आहे. तसेच हार्ड ड्राइव्ह रिप्लेसमेंटवरही बंधने आणण्यात येणार आहे. परिणामी नजीकच्या काळात हा वेग मंदावून कम्प्युटर आणि लॅपटॉपच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे.

इंटेलच्या या इशाऱ्यामुळे जगभरातील कम्प्युटर बनविणाऱ्या कंपन्यांनी कम्प्युटरची निमिर्तीवर बंधने आणण्यास सुरूवात केली आहे. हार्ड ड्राइव्ह निमिर्तीमधील मोठी कंपनी सिगेट टेक्नोलॉजीच्या कंपन्यांना मात्र पूराचा सरळ फटका बसला नसला तरी कंपन्यांना होणाऱ्या विविध पार्ट्सचा पुरवठा बंद झाल्याने त्यांच्याही उत्पादनावर बंधने येत आहे. उत्पादनावर कुऱ्हाड कोसळली असल्यामुळे शेअर बाजारातही इंटेलला चांगलाच फटका बसत असून कंपनीचे शेअर्स ४.८ टक्क्यांनी घटले आहेत. इंटेलसह एनविडीया या कंपनीचे शेअर्सही ३ टक्क्यांनी घसरलेत. निदान पुढील काही काळ तरी हार्ड डिस्क आणि परिणामी कम्प्युटर, लॅपटॉपच्या बाजारात अनिश्चितता असेल असे चित्र दिसत आहे. 
                                                                                         

No comments:

Post a Comment

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...