मला सर्वात जास्त आवडलेली आणि खुप अर्थपूर्ण अशी ही सातवीतील कविता.
ही कविता माणसाला जगण्याचा अर्थतर शिकवतेच पण जीवनात येणाऱ्या सर्व कठीण प्रसंगांना तोंड देण्यास शिकवते.
रे तुझीया सामर्थ्याने ढळतील दिशा हि दाही,
मी फुल तृणातील इवले उमलणार तरीहि नाही
शक्तीने तुझीया दिपुनी, तुज करतील सारे मुजरे,
पण सांग कसे उमलावे, ओठातील गाणे हसरे
जिंकिल मला दवबिंदु, जिंकिल तृणातील पाते,
अन स्वताःस विसरून वारा, जोडील रेशमी नाते
कुरवाळीत येतील मजला, श्रावणातल्या जळधारा
सळ्ऽसळून भिजली पाने, करतील मज सजल इशारा
रे तुझीया सामर्थ्याने, मी मला कसे विसरावे
रंगाचे अन्ऽ गंधाचे, मी गीत कसे गुंफावे
शोधीत धुक्यातूनी मजला, दवबिंदू होऊनी ये तु
जणु भिजलेल्या मातीचा, सजल सुगंधीत हेतू
तु तुलाच विसरून यावे, मी तुझ्यात मज विसरावे
तु हसत मला फुलवावे, मी नकळत आणि फुलावे

No comments:
Post a Comment