आपले व्यासपीठ मध्ये आपले स्वागत आहे. आमच्या या ब्लॉगवर तुम्हाला सर्व प्रकारची उपयुक्त व महत्वपूर्ण माहिती मिळेल. यातील काही बाबी या विचार करायला लावतील तर काही बाबी या कृती करायला भाग पाडतील. तुम्हाला आमचा ब्लॉग म्हणजेच आपले व्यासपीठ नक्कीच आवडेल आणि ते तुम्हाला आपलेसे वाटेल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद ............
Thursday, 13 October 2011
Saturday, 1 October 2011
मला सर्वात जास्त आवडलेली आणि खुप अर्थपूर्ण अशी ही सातवीतील कविता.
ही कविता माणसाला जगण्याचा अर्थतर शिकवतेच पण जीवनात येणाऱ्या सर्व कठीण प्रसंगांना तोंड देण्यास शिकवते.
रे तुझीया सामर्थ्याने ढळतील दिशा हि दाही,
मी फुल तृणातील इवले उमलणार तरीहि नाही
शक्तीने तुझीया दिपुनी, तुज करतील सारे मुजरे,
पण सांग कसे उमलावे, ओठातील गाणे हसरे
जिंकिल मला दवबिंदु, जिंकिल तृणातील पाते,
अन स्वताःस विसरून वारा, जोडील रेशमी नाते
कुरवाळीत येतील मजला, श्रावणातल्या जळधारा
सळ्ऽसळून भिजली पाने, करतील मज सजल इशारा
रे तुझीया सामर्थ्याने, मी मला कसे विसरावे
रंगाचे अन्ऽ गंधाचे, मी गीत कसे गुंफावे
शोधीत धुक्यातूनी मजला, दवबिंदू होऊनी ये तु
जणु भिजलेल्या मातीचा, सजल सुगंधीत हेतू
तु तुलाच विसरून यावे, मी तुझ्यात मज विसरावे
तु हसत मला फुलवावे, मी नकळत आणि फुलावे

Subscribe to:
Posts (Atom)